Sindhudurg Vengurle Boat Drowned : वेंगुर्ल्यामध्ये चार बोट दुर्घटनेतील चारही खलाशांचे मृतदेह सापडले
Sindhudurg Vengurle Boat Drowned : वेंगुर्ल्यामध्ये चार बोट दुर्घटनेतील चारही खलाशांचे मृतदेह सापडले
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले बंदरात खलाश्यांना घेऊन जाणारी बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. काल दोन तर आज दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेले चार पैकी तीन खलाशी मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरीमधील होते. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा रत्नागिरी मधील खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्ह्णून कामाला होते. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेतील बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले, मृतांपैकी तीन खलाशी मध्य प्रदेशातील तर एकजण रत्नागिरीती असल्याची माहिती समोर आली आहे.
























