सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा करूळ घाटातील रस्ता खचला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राज्य महामार्गावरील करूळ घाटरस्ता खचल्याने सध्या धोकादायक स्थितीमुळे हा घाटमार्ग प्रशासनाने 26 जुलैपर्यत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता भुईबावडा, फोंडा आणि आंबोली या घाटमार्गाचा वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यात काल पडलेल्या पावसाचा फटका वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटरस्त्याला बसला आहे. करूळ तपासणी नाक्यापासुन तीन ते चार किलोमीटर अतंरावर हा घाटरस्ता खचला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा घाटमार्ग आणखी खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटमार्ग वाहतुक धोकादायक असल्याने प्रशासनाने वाहतुकीस बंद केला आहे.


















