Ratnagiri | कोरोनामुळे यंदा कोकणात साध्या पद्धतीने शिमगोत्सव! टाळ-ढोलकीच्या तालावर लोकगीतं
कोकणात सध्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. गावागावातून सनई, ढोल ताशांचा आवाज सध्या कानावर पडू लागलाय. फाक पंचमीपासून होळीच्या या उत्सवाला सुरुवात होत असते. या दिवशी गावातील मानकरी आणि गावकरी आपल्या ग्रामदैवतेच्या मंदिरात एकत्र येत असतात. मंदिरातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदैवतेच्या नावाने बोंबा मारत मारत गावकरी ग्रामदैवतेच्या सहाणेवर येतात. आणि त्याठिकाणी ग्रामदैवतेची पहिली होळी पेटवली जाते.
गावकरी मंदिरात एकत्र येत पारंपारिक वेषभूषा साकारत हातात टाळ आणि ढोलकी घेऊन देवीला आरज लावतात. तिथून पुढे गावातील वाडीवाडीत फिरुन प्रत्येकाच्या घरोघरी जातात. तिथे ढोलकी आणि टाळाच्या नादात पारंपारिक गाण्यावर ठेका धरतात.यंदा कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या नियमानुसार शिमगा साध्या पद्धतीने साजरा केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या























