Navapancham Rajyog 2025 : डिसेंबर महिन्यात शनि-बुध ग्रहाची कमाल; नवपंचम राजयोगाने 'या' 3 राशी होतील मालामाल, हातात खेळेल पैसा
Navapancham Rajyog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 6 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी तो 29 डिसेंबरपर्यंत विराजमान असेल.

Navapancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींच्या जीवनावर दिसून येतो. बुध ग्रह हा बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो. येत्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत संक्रमण करताच शुक्र ग्रहाबरोबर संयोग होऊन लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे.
डिसेंबर महिन्यात बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल. यामुळे शनिच्या संयोगाने नवपंचम राजयोग (Navapancham Rajyog) निर्माण करणार आहे. त्यामुळे शनि-बुध ग्रहाचा हा नवपंचम राजयोग काही राशींसाठी फार भाग्यशाली ठरणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 6 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी तो 29 डिसेंबरपर्यंत विराजमान असेल.
मीन रास (Pisces Horoscope)
या राशीच्या नवव्या चरणात बुध आणि लग्न भावात शनि असणार आहे. त्यामुळे दिर्घकाळापासून एखाद्या सुरु असलेल्या समस्येवर आराम मिळू शकतो. तसेच, या काळात नशिबाची साथ तुमच्याबरोबरच असणार आहे. तुमच्या मेहनतीने तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. तुमच्या करिअर आणि प्रोफेशनवर शनिची दृष्टी असल्या कारणाने तुम्हाला पुण्य फळ मिळेल. चिंता करण्याची गरज नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी शनि-बुध ग्रहाचा नवपंचम राजयोग लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सुरु असलेल्या समस्या हळुहळू संपतील. तसेच, तुमच्यासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक संकटं दूर होतील. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी नवपंचम राजयोग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ असणार आहे. आर्थिक बाबींचं तुम्ही नीट नियोजन कराल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. हातात पैसा खेळेल. मात्र, मेहनतीने, कष्टाने तो पैसा कमवावा लागेल. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















