Sharad Pawar on Income Tax Raid : पवार कुटुंबीयांवरील आयटीच्या कारवाईवर शरद पवार म्हणाले...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स (Income tax) विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदंतेश्वर शुगर,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात येत आहे. काही कारखान्यांवर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून धाडीची कारवाई सुरू केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे. तर अंबालिका साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जंगल वाघ यांच्या काटावाडीतील घरी तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. जंगल वाघ हे काटावाडीतील अजित पवारांच्या घराजवळच राहतात.
Ajit Pawar यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी प्रकरणी Sharad Pawar यांना पहिली प्रतिक्रीया दिली आहे.