Sharad Pawar गटाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलसाठी उमेदवारांना मार्गदर्शन
Sharad Pawar गटाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलसाठी उमेदवारांना मार्गदर्शन
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांनी शरद पवार यांच्या सोबत संवाद साधला आहे. यावेळेला उमेदवारांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी विरोधामध्ये उभ्या असलेल्या अजित पवारांच्या पॅनलवरती सुद्धा जोरदार निशाना साधला. राजकारण आणायचं नाही हा निर्णय घेतला मात्र दुर्दैवान वेगळं चित्र दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा..
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांकडे (Municipal Election) वळले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे (BMC Election) सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं.
मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचे की नाही, हे बसून ठरवू. मुंबईत आमच्यात सर्वाधिक ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची आहे. साधारणतः आगामी तीन महिन्यांत निवडणुकीची घोषणा होईल, अशी शक्यता आहे. मात्र, आम्ही अद्याप एकत्रित लढण्याबाबत कोणतीही ठोस चर्चा केलेली नाही. लवकरच आम्ही सर्वजण काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले.























