Sharad Pawar house attack : त्या कॉलमध्ये आंदोलकांना CSMT स्थानकावर तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Sharad Pawar)यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या अभिषेक पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान काही खळबळजनक माहिती हाती लागली आहे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.
पोलिसांना अभिषेक पाटील आणि नागपूरमधून ताब्यात घेतलेल्या संदीप गोडबोले यांच्यातील संवादाची क्लिप हाती लागली आहे.