Sayaji Shinde EXCLUSIVE : आधी शरद पवारांनी बोलावलं असतं तर तिकडे गेलो असतो
Sayaji Shinde EXCLUSIVE : आधी शरद पवारांनी बोलावलं असतं तर तिकडे गेलो असतो
बॉलीवूड मध्ये काम करताना सतरा वर्षानंतर मला यश मिळालं त्यावेळी 2000 साली राम गोपाल वर्मा म्हणाले कमीत कमी दहा लाख रुपये मानधन घे त्याच्या खाली काम करू नको. त्यावेळीं मला महेश मांजरेकर यांनी कुरुक्षत्रे फिल्म ऑफर केली आणि त्यासाठी एक लाख रुपये मानधन ठरवलं. त्यावेळी मनात विचार केला त्यावेळी मी सतरा वर्ष स्ट्रगल करत होतो त्यावेळी कुठे राम गोपाल वर्मा मला सांगायला आले होते कुठलाही विचार न करता महेश मांजरेकरची फिल्म स्वीकारली. आताही मला मी कधी जन्मात राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं परंतु मनात विचार आला मी निर्णय घेऊन टाकला.
आधी शरद पवारांनी बोलावलं असतं तर त्यांच्याकडे गेलो असतो. आता एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत ते सातारकर आहेत किंवा राज ठाकरे यांच्यासोबत माझं सतत बोलणं होत असतं. परंतु त्यावेळी कधी विचार झाला नव्हता. आता अजित पवार यांना निवडलं म्हणून बाकीचे माझे दुश्मन आहेत असं अजिबात नाही.