Satara : शिल्पा चिकणेवर... साताऱ्याच्या गांजे गावातील पहिली महिला सैनिक, ग्रामस्थांकडून फुलांची उधळण
सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या लेकीही आता देशसंरक्षणासाठी सीमेवर जाताहेत.. साताऱ्यात अशी अनेक गावं आहेत, ज्या गावातल्या प्रत्येक घरातला किमान एक व्यक्ती सीमेवर देशसंरक्षण करतोय. अशाच गांजे गावातल्या शिल्पा चिकणे या तरुणीची आसाम रायफल्समध्ये भरती झाली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सहा महिन्यांपूर्वीच शिल्पाची भारतीय सैन्यदलात निवड झाली.. त्यानंतर काल शिल्पा तिच्या गावात परतली, त्यावेळी फुलांची उधळण करत आणि भारत माता की जयचा जयघोष करत गावकऱ्यांनी तिचं स्वागत केलं..आपल्या गावातील मुलीच्या यशाचा अभिमान गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता..गावातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते



















