(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara Crime Firing : साताऱ्यात शूट आऊट! दोन जणांची गोळ्या घालून हत्या, कारण काय?
साताऱ्यातील पाटण तालुक्यात काल रात्री दोघांची हत्या करण्यात आली.. यातील आरोपी मदम कदम ठाण्याचा माजी नगरसेवरक आहे. कट्टर शिवसैनिक अशी त्याची ओळख आहे. हत्या झाली तेव्हा त्याची मुलंही तिथं हजर होती असं पोलिसांनी सांगितलं. पाटणमधील गुरेघर येथील फार्महाऊसवर काल रात्री श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत यांची हत्या झाली. यामागचं कारण आता समोर आलंय. कोरडेगावातील ग्रामस्थांचा आरोपी कदमसोबत चार दिवसांपूर्वी वाद झाला होता. काल रात्री जाधव आणि सावंतांसह अनेक ग्रामस्थ मदन कदम यांना जाब विचारण्यासाठी गुरेघरला गेले होते.. त्यांनी जाब विचारल्याचा कदमला इतका राग आला की त्यानं गोळीबार सुरू केला, यामध्ये श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर दोन्ही मृतदेह दोेन तास रक्ताच्या थारोळ्यात पडले होते असा आरोप कोरडेगावच्या ग्रामस्थांनी केला आहे.. आरोपी मदम कदम आणि त्याच्या मुलांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.