Sanjay Raut PC Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, विधानपरिषदेवरून फडणवीसांवरही निशाणा
Sanjay Raut PC Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, विधानपरिषदेवरून फडणवीसांवरही निशाणा
Sanjay Raut : महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल (Loksabha Result) पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले आहेत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council elections) 23 मतांचा कोठा आहे. मला पूर्ण खात्री आहे की, सध्याच्या परिस्थितीत पाहता महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असे राऊत म्हणाले. काँग्रेसची मतं फुटू शकतात मग भाजप, शिंदे गट,अजित पवार गट यांची मत फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही. ते काय आकाशातून पडले आहेत का? असा सवाल राऊतांनी केला. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूनं असल्याचे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार निवडूण येतील
विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडूण आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपलासुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात इतकी मतं नाहीत. अजित पवार गट, शिंदे गटाकडे इतकी सुद्धा मतं नाहीत. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले, काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नक्कीच असल्याचे संजय राऊत म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार निवडून येतील असेही राऊत म्हणाले. काँग्रेसची मत फुटू शकतात मग भाजप, शिंदे गट,अजित पवार गट यांची मत फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही. ते काय आकाशातून पडले आहेत का? असा सवाल राऊतांनी केला. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने आहे ते लोकसभेत दिसले आहे. त्यामुळं त्यांचेही आमदार फुटू शकतात ना, फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात असं राऊत म्हणाले. काँग्रेसचीच मत फुटणार,अन्य कोणाची मत फुटणार नाहीत या भ्रमात आता कोणी राहू नये असेही राऊत म्हणाले.























