Sanjay Raut PC : महाराष्ट्राच्या मनातील महाराजांच्या श्रद्धेचा व्यापार सुरू : संजय राऊत
Sanjay Raut PC : महाराष्ट्राच्या मनातील महाराजांच्या श्रद्धेचा व्यापार सुरू : संजय राऊत
खंडोजी खोपडे,सूर्याजी पिसाळ यांची अवलाद, हे आम्हाला नकली बोलणार ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली, ज्यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार मुळात वाघ नख ऐतिहासिक आहेत, असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच ती वाघ नको वापरली असतील तर आम्ही त्या वाघनखांना प्रणाम करतो पण इतिहास आणि इतिहास तज्ञ सांगत आहेत आणि लंडनच म्युझियम सांगतय की खात्री नाही की ती वाघ नखं तीच आहेत का तुम्ही जसं एकेकाळी भाजप मतांसाठी गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं, कुठलही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे त्या पद्धतीने या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजां संदर्भात महाराष्ट्रात जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवला आहे वाघ नख ही काय मत मागण्याची वस्तू आहे का, राजकारण करण्याची वस्तू आहे का, ती ऐतिहासिक आणि श्रद्धेची जागा आहे तुम्ही लोकांना फसवत आहे, ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध, शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हे मतांपुरतं बोलायला ठीक आहे पण त्यांचा संबंध काय हे मला त्यांनी सांगावं भारतीय जनता पक्षाचा कोणत्यातरी इतिहासाशी संबंध आलाय का, भाजपचा संबंध ना कधी स्वातंत्र्यसंग्रामाशी आला, ना महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यासाठी आला, ना आणीबाणीच्या संघर्षाशी आला वाघ नखांचा अपमान कोणी करत नाही वागणकांचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत, हे लोक इतिहासाचा अपमान करत आहेत हे स्वतः डुबलीकेट आहेत त्यांना स्वतःला डुबलीकेट माला विषयी आकर्षण आहे छत्रपतींच्या वाघ नखाशी आम्हाला अत्यंत आदर आणि श्रद्धा आहे, पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघ नखं वाघ नखं करत आहेत आधी स्वतःची नखं कापा नीट मग वाघ नखांवर बोला .. राऊतांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर हल्लाबोल केला