Sanjay Raut | शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, भाजपचा भगवा भेसळयुक्त; संजय राऊतांचा भाजवर पलटवार
शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला दिलं. तसंच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. एबीपी माझाशी संजय राऊत यांनी एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिकेसाठी भाजपने 'मिशन मुंबई' सुरु केलं आहे. याबाबत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतु भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. याबाबत बुधवारी (18 नोव्हेंबर) भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)