एक्स्प्लोर

सीमीचा प्रमुख, ISIS कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?

साकीब नाचन "स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया" (SIMI) या भारतात बंदी असलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातील प्रमुख सदस्य होता.

मुंबई : भिवंडी (bhiwandi) तालुक्यातील पडघा-बोरीवली परिसरातील रहिवासी साकीब नाचन हा गेल्या तीन दशकांपासून देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय राहिलेला एक अत्यंत वादग्रस्त आणि धोकादायक व्यक्ती म्हणून ओळखला जातो. 1992 च्या दशकात त्याचे खलिस्तानी अतिरेक्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात त्याला CBI कडून अटक झाली होती. त्यानंतर गुजरातमधील एका दहशतवादी (Terrorist) प्रकरणात दोषी ठरवत टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, मात्र नंतर या शिक्षेत सवलत देत केवळ ५ वर्षे कारावास झाला. 2002-03 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये साकीब नाचनचा सहभाग ठामपणे सिद्ध झाला होता. विलेपार्ले, मुलुंड आणि मुंबई (Mumbai) सेंट्रल येथे झालेल्या स्फोटांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातही त्याला सुमारे १० वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगात चांगले वर्तन दाखवल्यामुळे त्याची वेळेपूर्वी सुटका झाली.

साकीब नाचन "स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया" (SIMI) या भारतात बंदी असलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातील प्रमुख सदस्य होता. SIMI वर बंदी आल्यावरही त्याच्या कट्टर विचारसरणीत बदल झाला नाही. उलट त्याच्यावर ISIS या जागतिक दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे आरोप झाले. सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानुसार, साकीब नाचनने युवकांना भरती करून त्यांना धर्माच्या नावावर ब्रेनवॉश करून कट्टरपंथी बनवण्याचे काम केले. साकीब नाचनने भिवंडी तालुक्यातील बोरीवली गावाला 'अल-शाम' या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केल्याचा खळबळजनक आरोप आहे. त्याने या गावाला ‘ISIS मुक्त क्षेत्र’ म्हणत एक वेगळं इस्लामिक राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पडघा गावात 80–85% मुस्लिम लोकसंख्या असून, कोकणी मुसलमानांचा प्रभाव आहे. हा भाग आर्थिकदृष्ट्याही सक्षम असून लाकूड, गोडावून, ट्रकिंग यांसारख्या व्यवसायांत सक्रिय आहे.

2023 मध्ये नाचनला अटक

डिसेंबर 2023 मध्ये नाचणला आयएसएस मोड्युल मध्ये NIA ने अटक केली होती आणि दिल्ली येथील तिहार जेलमध्ये ठेवण्यात आला होता तेव्हापासून तो तिहार जेलमध्येच होता. त्या जेलमध्ये असताना ब्रेन स्ट्रोक झाल्याने प्रकृती बिघडली होती त्यामुळे त्याला दिल्ली येथील दीन दयाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु प्रकृतीत काही सुधार झाली नाही दिवसान दिवस प्रकृती खालावत असल्याने आज डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला आहे अशी माहिती एजन्सीने ने दिली आहे 

एटीएएस अन् एनआयएचा भिवंडीत छापा

२ जून २०२५ रोजी ATS, NIA आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी मिळून पडघा आणि भिवंडी परिसरात एकाच वेळी २२ ठिकाणी छापे टाकले व घातक शस्त्रे,, सिमकार्ड्स, मोबाइल्स आणि महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या छाप्यांच्या वेळी साकीब नाचन आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर नजर ठेवली जात होती. यापूर्वी २०२३ मध्ये देखील NIA ने पुणे, सोलापूर, मुंबई, ठाणे या भागांत मोठी कारवाई केली होती. त्यावेळी साकीब, त्याचा मुलगा आणि काही अन्य व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात आले होते. त्यावेळीही अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सॉफ्टवेअर आणि धर्मांध साहित्य सापडल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या साकीब नाचन दिल्लीतील तिहार तुरुंगात असून, जून २०२५ मध्ये त्याला मेंदूचा रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. उपचारा दरम्यान  त्याचा मृत्यू झाला आहे.  त्यांनी पसरवलेल्या जाळ्याचा संपूर्ण यंत्रणा  तपास करत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकिब नाचनचा दिल्लीत मृत्यू; भिवंडीत मोठा फौजफाटा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget