शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
आज (28जून) सकाळी त्यांच्या घरातील सदस्यांनी शेतात शोध घेतला असता, शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.

Chhatrapati Sambhajinagar: पैठण तालुक्यातील बालानगर येथे शेततळ्यात पडून एका ॲम्बुलन्स चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव निवृत्ती गोर्डे (रा. बालानगर) असून, ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील 102 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत होते. निवृत्ती गोर्डे हे मागील दोन दिवसांपासून घरी आले नव्हते. त्यांच्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक चिंतेत होते. आज (28जून) सकाळी त्यांच्या घरातील सदस्यांनी शेतात शोध घेतला असता, शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. हे दृश्य पाहून एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला असून, शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून बेपत्ता, शोधाशोध केली तेंव्हा..
निवृत्ती गोर्डे हे मागील दोन दिवसांपासून घरात नव्हते. त्यांनी कुणालाही न सांगता घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आज सकाळी त्यांच्याच शेतामध्ये घरातील सदस्य गेले असता, शेततळ्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीसांना कळवले. काही वेळातच पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा
गेल्या काही महिन्यांपूर्वी एका जंगलात (Forest) विदेशी पर्यटक महिलेचा जिवंतपणे बांधून ठेवल्याचा धक्कादायक व माणूसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला होता. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या महिलेला सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. आता, पुन्हा एकदा सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील एका जंगलात नेपाळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
हेही वाचा

























