Sanjay Raut MVA : मविआचे नारद संजय राऊत? ठाकरे-पवारांतील मतभेदांमध्ये वाढ?
आरोप प्रत्यारोपांसाठी सध्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षांची गरजच नाही का हा प्रश्न आत्ताची स्थिती बघून पडतोय. संजय राउतांनी सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीच्या वर्मावर बोट ठेवलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटावरच टीकेचे बाण सोडलेयत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मुर्त रुप देण्यात राउतांचा महत्वाचा वाटा होता. पण याच राऊतांच्या लेखणीमुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडायचं का असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारलाय. त्यातच जगतापांच्या ठाकरे गट प्रवेशाच्या मुद्द्यावरुन नाना पटोलेंनीही ठाकरेंना इशारा दिलाय. या घडामोडींमुळे मविआची वज्रमुठ सैल होतेय यात शंका नाही पण याचा राजकीय फायदा कोण घेऊ पाहतंय हा प्रश्न मात्र नक्की उपस्थित होतो....
महत्त्वाच्या बातम्या




















