Sanjay Rayut Full PC : जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, राऊतांचा थेट मोदींवर निशाणा
Sanjay Rayut Full PC : जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, राऊतांचा थेट मोदींवर निशाणा
भाजपला औरंगजेबावर एवढं प्रेम आलं आहे? एवढं प्रेम का आहे औरंगजेब वर, औरंगजेब एक शासक होता आणि त्याने महाराष्ट्रावर वारंवार हल्ले केले त्याचा जन्म गुजरात मध्ये झालाय हे जर चुकीचा असेल तर भाजपने आम्हाला इतिहास सांगितला पाहिजे कि औरंगजेब चा जन्म कुठे झाला होता. जसा आम्ही गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर,बाळासाहेब ठाकरे यासारख्या महान युद्धांचा जन्म महाराष्ट्रात झाला, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरात मध्ये झाला. औरंगजेब चा जन्म गुजरात मध्ये झाला तर मी काय चुकीचा बोललो, ज्या मातीत औरंगजेब चा जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागले असतील.


















