Sudha Murthy on Sambhaji Bhide : संभाजी भिडेंबरोबरच्या भेटीवर सुधा मूर्ती यांची पहिली प्रतिक्रिया
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या बहुचर्चित भेटीवर इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. संभाजी भिडे यांना आपण ओळखत नाही, ज्येष्ठ व्यक्ती असल्यानं आपण त्यांना नमस्कार केला, असं सुधा मूर्ती यांनी माझाला सांगितलं. त्यांचं मत मला माहीत नाही आणि त्यांच्याशी मी फार बोलले नाही, असं सुधा मूर्ती म्हणाल्या. त्यांनी चर्चेसाठी वेळ मागितला, पण मी वेळ नसल्याचं सांगितलं, असं सुधा मूर्ती यांनी म्हटलंय. संभाजी भिडे यांच्या टिकलीच्या वक्तव्यानं अलिकडेच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सांगलीत सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीवरून सोशल मीडियात मोठी चर्चा झाली. त्यावर सुधा मूर्ती यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.





















