Sangli: मिरजेत तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रेमविवाहाच्या रागातून हल्ल्याचा आरोप ABP Majha
सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप होतोय.. योगेश लवाटे असं या तरुणाचं नाव असून गुरुवारी रात्री मोटारसायकल वरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून पळ काढला.. गंभीर जखमी झालेल्या योगेशला त्याच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मिरज शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात देखील घेतलेय. दीड महिन्यांपूर्वी योगेशनं प्रेमविवाह केला होता. त्यावेळी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांचा मोठा वादही झाला होता. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी योगेशला धमकी दिली होती. सद्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
