Sachin Vaze on Anil Deshmukh : सचिन वाझेंचे गौप्यस्फोट ; विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप
Sachin Vaze on Anil Deshmukh : सचिन वाझेंचे गौप्यस्फोट ; विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप
हेही वाचा :
गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. त्याचबरोबर वाझेंनी (Sachin Waze) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी दिली आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे देखील नाव लिहले आहे. वाझेंच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संपुर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "या पत्राची आणि नावाची वेळ पाहा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कशा या गोष्टी कशा बाहेर आल्या. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाबाबत न्यायालयात जी केस सुरू आहे, त्यामध्ये एकही आरोप सिध्द झालेला नाही. सगळं खोटं ठरलेलं आहे. १०० कोटी रूपयांचा हिशोब कुठेच नाही. हे आरोप खूप बालिश आहेत. राज्याचं राजकारण गलिच्छ झालेलं आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, धोरणं, महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही कधीच कोणावर आरोप केले नाहीत. आरोप केलेले ते शंभर कोटी कुठे आहेत. मग आरोप खोटा ठरला ना, ज्यांनी देशमुखांवर आरोप केले ते आज कुठे आहेत असाही सवाल सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) म्हटलं आहे. संजय राऊत, संजय भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना त्यांनी किती त्रास दिला, ते मी पाहिलं आहे, आजचं राजकारण खूप गलिच्छ झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर आलं आहे. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं असाही सवाल यावेळी सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) म्हटलं आहे. सचिन वाझे (Sachin Waze) हे सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर सध्या मनसूख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आह. सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप करण्यात आले. परमबीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते. आता त्याची पुष्टी सचिन वाझेंनी केली आहे. सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावर जात होते. त्यावेळी ते पीएच्या संपर्कात होते. आता सचिन वाझेंनी (Sachin Waze) समोर येऊन देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे हे स्पष्ट केले आहे. आरोपच नाही केले तर देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिले आहे. त्यामुळे आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात मागील वर्षी एप्रिल महिन्यात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.