Hingoli : हिंगोलीतील दुर्गम भागातील गावात 90% लसीकरण, आरोग्य अधिकाऱ्यांना यश
एकीकडे शहरी भागात लसीकरणाचा टक्का पूर्ण करण्यासाठी विविध मोहिमा हाती घ्याव्या लागत आहेत. मात्र राज्यातल्या दुर्गम भागात मात्र नागरिकांचा सहभाग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे लसीकरण जवळपास पूर्ण होत आलंय. हिंगोलीमधील अनखळी, पोटा ाणि एकबुजरेवाडी ही तीन अतिशय दुर्गम गावं. इथे पोहोचण्यासाठी अक्षरशः पाच किलोमीटर चालत जावं लागतं.. वाटेत गुडघाभर पाण्यातूनही चालावलं लागतं. मात्र याही परिस्थितीत आरोग्य अधिकारी डॉ. प्रतीक्षा देशमुख यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून या गावांमधील ९० टक्के लसीकरण पूर्ण केलेलं आहे. गावकऱ्यांनीही त्यांच्या या मेहनतीला प्रतिसाद दिलाय. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेत दुर्गम भागातली ही गावं अव्वल ठरली आहेत.





















