Rohit Pawar : विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
Rohit Pawar : विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
काल जामखेडच्या खर्डा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) आगामी काळात मंत्री होतील, असे संकेत दिले होते. तर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी त्यांचे "भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेले आहेत. यामुळे रोहित पवार महाराष्ट्राचे पुढे मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. आता यावर रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा आशयाचे बॅनर झळकले आहेत. आता रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.