एक्स्प्लोर
MVA Protest: काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सत्याचा मोर्चाला अनुपस्थित राहणार
मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या मोर्चावरून काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मनसेच्या संभाव्य महाविकास आघाडी प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या मोर्चात सामील होण्याची शक्यता कमी आहे. 'शारीरिक दृष्ट्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, मात्र मोर्चाला पाठिंबा आहे', असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात सारखे नेते उपस्थित राहणार असले तरी, प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, राज्यात ‘नमो टुरिझम सेंटर’च्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवीन वाद निर्माण झाला असून, 'गडकिल्ल्यांवर सेंटर उभारल्यास ते फोडून टाकू' असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















