एक्स्प्लोर
Bihar Politics: 'CM पदाचा चेहरा जाहीर करा', Nitish Kumar यांची अट BJP ने फेटाळली?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NDA मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि भाजप (BJP) यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे चित्र आहे. 'नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यास भाजपनं नकार दर्शवल्याची' सूत्रांची माहिती आहे. JDU पक्षाने निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याची अट ठेवली आहे, मात्र भाजप ही अट মানण्यास तयार नाही. याशिवाय, जागावाटपावरूनही आघाडीत मतभेद असून, जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्यासह इतर घटक पक्षही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही नेतृत्वाखाली निवडणूक लढवून निकालानंतर मुख्यमंत्री ठरवण्याचा 'Maharashtra Pattern' भाजप वापरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















