(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Dhangekar On Pune Drugs : ड्रग्ज वापरात पंजाबनंतर पुण्याचा नंबर, मुख्यमंत्र्यांनी आधी का बुलडोझर फिरवला नाही?- धंगेकर
Ravindra Dhangekar On Pune Drugs : ड्रग्ज वापरात पंजाबनंतर पुण्याचा नंबर, मुख्यमंत्र्यांनी आधी का बुलडोझर फिरवला नाही?- धंगेकर
रविंद्र धंगेकर बाईट
आज पक्षाची बैठक आहे
पुण्यातील पब आणि ड्रग्जचा विषय आहे
पंजाबनंतर आता पुण्याचा नंबर लागतो
मुख्यमंत्र्यांनी आधीच बुलडोझर फिरवण्याचे आदेश का दिले नाहीत
आता केवळ नावापुपती कारवाई होत आहे
पुण्यातील प्रत्येक घराच्या उंबर्यावर आता अंमली पदार्थ पोहचले आहेत
राष्ट्रभक्ताच पुण्याला कलंक लागत आहेत
परदेशी मुलं पब संस्कृती घेऊन जाणार का ?
बी बातमी पण वाचा
Latur Paper Leak Case: मोठी बातमी! नीट पेरफुटीचं रॅकेट लातूरपर्यंत मर्यादित नाही, जिल्ह्याजिल्ह्यात पसरलंय सबएजंट्सचं जाळं; दोन आरोपी शिक्षकांची कबुली
NEET Exam Paper Leak Case Latur : लातूर : नीट पेपरफुटी (NEET Paper Leak Case) प्रकरणानं संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. त्यानंतर उघडकीस आलेल्या लातूरमधील (Latur News) रॅकेटनं तर महाराष्ट्राची (Maharashtra) झोपच उडवली आहे. लातुरात जिल्हा परिषदेचे दोन आरोपी शिक्षक नीट पेपरफुटीचं रॅकेट चालवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. याप्रकरणात दिवसागणित अनेक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक खळबळ माजवणारा खुलासा दोन आरोपी शिक्षकांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यासाठी पैसे उकळल्याची धक्कादायक माहिती दोन आरोपी शिक्षकांनी पोलीस चौकशीत दिली असल्याची माहिती मिळाली. आरोपी शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलीस आतापर्यंत 28 लोकांपर्यंत पोहोचले आहेत.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET Exam) गुण वाढवण्याचं आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी 4 ते 5 लाख रुपये उकळल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला. या रॅकेटमध्ये सहभागाच्या संशयावरून पोलीस कोठडीत असलेला जिल्हा परिषद शाळेच शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली. या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सबएजंट कार्यरत असल्याची कबुलीही आरोपी शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान, यापैकी 28 जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, यातीलच काहींनी आपल्या पाल्यांसाठीही पैसे दिलेले असल्याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे आता यांना या रॅकेटमधले सबएजंट म्हणायचं की, पालक या संभ्रमात पोलीस पडले आहेत.