Ravi Raja : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचं काम दुसऱ्या कंपनीला द्या - रवी राजा
गोरेगाव मुलुंड लिंक रोड वरील उड्डाणपुलाचे आणि उन्नत मार्गामध्ये पूलांची काम दुसऱ्या कंपनीला देऊन आधीच्या कंपनीचे कंत्राट रद्द करा. महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेत्यांची मागणी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर पुलाचं काम सुरु असताना, चार खांब कोसळले. हे काम पी एस सिंगला या कंपनीकडे आहे. याच कंपनीकडे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाण पूल आणि उन्नत पुलाची कामं आहेत माहिती अशी आहे की या कंपनीच मुंबईत सुरु असलेलं काम पण निकृष्ट दर्जाचं आहे. ज्यामुळे बिहारसारखी दुर्घटना मुंबईत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पी एस सिंगला कंपनीकडून काम काढून घेऊन या कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि उर्वरित काम दुसऱ्या कंपनीला द्यावे अशी मागणी आता रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.




















