Rashmi Barve : अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेला हा अन्याय आहे - रश्मी बर्वे
Rashmi Barve : अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेला हा अन्याय आहे - रश्मी बर्वे या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी आहे आहे. रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर महायुती सह अपक्ष उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत आहे. रश्मी बर्वे यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र तयार करतांना कशा प्रकारे खोटी कागदपत्र जोडली त्यामुळे त्यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्र कसे खोटे आहे हे वकिलामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पटवून सांगण्यासाठी वकिलांची फौज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत उभी करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज टिकतो कि बाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भाजप नेते आशिष देशमुख आशिष देशमुख यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.