(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tripura Violence : Tripura कथित हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रात काढलेल्या रॅलीलाच हिंसक वळण
त्रिपुरा राज्यात पैगंबर इस्लाम हजरत मुहम्मद यांच्याबद्दल एका रॅलीत अपशब्द वापरले त्याचाच विरोधात अमरावती शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो मुस्लिम बांधवांची धडक दिली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या आंदोलकांनी अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानं जबरदस्ती केल्या बंद तर अनेक दुकानांची केली तोडफोड. नांदेडमध्ये सुध्दा या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता व या बंदलाही गालबोट लागलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता, यावेळी काही ठिकाणी जमावानं दगडफेक केलीत्यामुळं जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. इकडे भिवंडीतही मुस्लिम समाजानं बंद पुकारला आहे. शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडीतल्या बंदला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं पाठिंबा दिलाय..