Raj - Uddhav Thackeray Special Report : 'मातोश्री'ला ध्यास, 'शिवतीर्थ'लाही आस? Special Report
Raj - Uddhav Thackeray Special Report : 'मातोश्री'ला ध्यास, 'शिवतीर्थ'लाही आस? Special Report
दरम्यान युतीच्या चर्चेला खरं तर राज ठाकरेंनी सर्वात आधी हात घातला आणि लागलीच, वेळ न दवडता उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून वारंवार एकत्र येण्याची भाषा करण्यात आली, मात्र मनसेकडून त्यावर तोंडावर बोट ठेवण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटींना राज ठाकरेंनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे आता मनसेकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली असली तरी दोन्ही बंधू एकाच ट्रॅकवर कधी येणार हा मात्र प्रश्न आहे. पाहूया. मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडण, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक. सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याच आव्हान करतो. एकत्र येण आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये. मी आज सांगतो जी काही भांडण माझ्याकडन. नवतीच कोणाची मिटून टाकली चला. ही दोन्ही वक्तव्य आहेत 19 एप्रिलची. या वक्तव्यांना आता दीड महिना उलटला. या दीड महिन्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या विषयावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. ठाकरेंच्या पक्षाने तर प्रतिक्रिया देऊन देऊन या विषयावर सकारात्मकतेचा पूर आणला. तर मनसेच्या नेत्यांनी पूर्वानुभवाची ढाल समोर करत नाक मोरडली. आणि त्यानंतर या विषयावर न बोलण्याचा निर्णय घेत मौनाची भूमिका स्वीकारली. मात्र हा विषय प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्या पलीकडे जातच नसल्याच चित्र आहे. राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांपैकी कोणीच स्वतःहून हा विषय पुढे नेण्यासाठी पावलं उचलल्याचं अद्याप तरी दिसलेलं नाही. माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर मात्र सकारात्मक मिळतायत. आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे.























