Raj Thackeray Pune Rally : मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात, पुण्यात घेणार सभा
Raj Thackeray Meeting in Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पीएम नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) महायुतीला पाठिंबा दिलाय. त्यानंतर भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे (Ratnagiri-Sindhudurg) उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज ठाकरेंना सभेसाठी विनंती केली होती. राज ठाकरे यांनी नारायण राणेंचा विनंतीला मान देत कणकवली येथे सभा घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज ठाकरे आता भाजपसाठी सभांचा धडाका लावणार आहेत. पुण्यातही राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे.























