एक्स्प्लोर

Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रमुख उपस्थिती आज शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सांगता सभा पार पडली. या सभेतून महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मी जास्तवेळ भाषण करणार नाही, केवळ तीन टप्प्यात माझं भाषण पूर्ण करणार आहे. त्यातील, एक टप्पा झाला आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींसमोर महाराष्ट्राच्या अपेक्षांची यादीच वाचून दाखवली. तर, असदुद्दीन औवेसीचं (Asaduddin owaisee) नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी महत्वाची मागणी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. देशभक्त मुस्लिमांना सुरक्षित वावरण्यासाठी हे करा, असेही राज ठाकरेंनी म्हटले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन टप्प्यातील कार्यकाळावर मी बोलणार आहे, त्यातील पहिल्या 5 वर्षाबद्दल मी 2019 मध्येच बोललेलो आहे. मी जेव्हा टीका करायची तेव्हा टीका केली आणि जेव्हा कौतुक करायचं तेव्हा कौतुकही करतो, असे म्हणज राज ठाकरेंनी राम मंदिर व कलम 370 च्या मुद्द्यावरुन मोदींचे कौतुक केले. मोदींना मी खरोखर धन्यवाद देतो, आपण होतात म्हणूनच ते राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं. नरेंद्र मोदींनी एक गोष्ट करुन दाखवली ती म्हणजे ट्रीपल तलाक, तलाक.. तलाक.. तलाक... म्हणून मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्यावर मोदींनी ही गोष्ट करुन सर्वात धाडसी काम केलंय, असं मला वाटतं, असे म्हणत ट्रीपल तलाक कायद्याचे स्वागत केले. 

मी तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ पुढील 5 वर्षांसाठी. महाराष्ट्राच्या आमच्या आपणाकडून खूप अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण कराल ही अपेक्षा करतो. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच आमची संपत्ती, आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, या किल्ल्यांचा विकास व्हावा, ही अपेक्षा आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात पूर्ण करावं, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच, संविधानाला धक्का लागणार नाही हेही मोदींनी आणखी कणखरपणे सांगावे, असेही राज ठाकरेंनी म्हटले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण
Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget