Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरेंची भूमिका पटली का?बैठकीनंतर मराठा आंदोलक म्हणतात...
Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरेंची भूमिका पटली का?बैठकीनंतर मराठा आंदोलक म्हणतात... धाराशिवमध्ये राज ठाकरेंची मराठा आंदोलकांशी चर्चा, राज ठाकरे जरांगेंशी बोलून भूमिका स्पष्ट करणार मराठा आंदोलकांचा दावा, ठाकरेंविरोधातलं आंदोलन स्थगित - मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, तिथं मराठा आंदोलकांनी निदर्शनं केली. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं विधान आज राज यांनी सोलापुरात केलं होतं. त्यामुळे मराठा आंदोलक संतापले, आणि राज यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्यासाठी थेट पुष्पा पार्क हॉटेलमध्ये पोहोचले. काही वेळानं राज स्वतः खाली आले, आणि खोलीत येऊन चर्चा करा, इथं अजिबात घोषणाबाजी करायची नाही असं म्हणाले. आंदोलकांना ही भाषा अरेरावीची वाटली, ज्यामुळे ते राज यांच्याशी चर्चा न करता हॉटेलच्या प्रवेशद्वारावर गेले, आणि पुन्हा घोषणा देऊ लागले. त्यानंतर तब्बल २ तासांनी राज ठाकरेंनी आंदोलकांशी चर्चा केली.. राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय