Punjab : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या परप्रांतीयांबाबत राज ठाकरे स्टाईलचं वक्तव्य वादात
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी परप्रांतीयांबाबत राज ठाकरे स्टाईल केलेल्या एका वक्तव्यानं काँग्रेस अडचणीत आलीय. यूपी, बिहार आणि दिल्लीतले लोक पंजाबमध्ये येऊन सत्ता मिळवू इच्छितात त्यांना थारा देऊ नका, असं वक्तव्य मुख्यमंत्री चन्नी यांनी केलं. त्यातही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केल्यानं विरोधकांनी काँग्रेसला घेरलं आहे. भाजप, आप, जेडीयू आणि बसपा यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवलीय. त्यातही या वक्तव्यावर प्रियंका गांधी यांनी हसत-हसत टाळ्या वाजवल्या अशी टीका करत काँग्रेसनं या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केलीय. विभाजन करण्याचं काँग्रेसचं धोरण आहे आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेनं उत्तर द्यावं, अशी टीका विरोधकांनी केलीय.



















