एक्स्प्लोर
Pune Godwoman Fraud: 'अकाउंटमध्ये पैसे ठेवले तर दोष जाणार नाहीत', सांगत IT इंजिनियरची 14 कोटींना फसवणूक
पुण्यातील आयटी इंजिनियर दीपक डोळस (Deepak Dolas) यांची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदिका पंढरपूरकर (Vedika Pandharpurkar) नावाच्या एका महिलेने अंगात शंकर महाराज (Shankar Maharaj) संचारत असल्याचा बनाव करून ही फसवणूक केली आहे. ‘तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवले तर मुलींचे दोष जाणार नाहीत,’ असे सांगून वेदिकाने डोळस यांना त्यांची सर्व संपत्ती तिच्या खात्यात टाकायला लावली. आजारी मुली बऱ्या होतील या आशेने डोळस यांनी पुण्यातीलच नव्हे, तर इंग्लंडमधील मालमत्ताही विकल्या. मात्र, मुली बऱ्या झाल्या नाहीत आणि त्यांची आयुष्यभराची कमाईदेखील गेली. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, वकील अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईसाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे म्हटले आहे. एबीपी माझाच्या टीमने आरोपी वेदिका पंढरपूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















