Pune Ektanagar Flood : पुण्यातील एकतानगरमध्ये नुकसानीचे पंचनामे; एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट
Pune Ektanagar Flood : पुण्यातील एकतानगरमध्ये नुकसानीचे पंचनामे; एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट
Pune Rain Update : पुण्यात पावसाची उसंत, खडकवासलातून पाण्याचा विसर्गही घटला; पण एकता नगरमध्ये वीज गायब, प्यायला पाणीही नसल्याने नागरिकांचे हाल
पुणे : पुण्यातील महापुराचा (Pune Flood) मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसलाय. आज पुण्यात पावसानं विश्रांती (Pune Rain Update) घेतलीय. दरम्यान खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. सिंहगड रोड, एकतानगर परिसर काल जलमय झाला होता. दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलंय. मात्र या पुरामुळे पुणेकरांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेकांचं संसार वाहून गेलेत..दरम्यान व्यापाऱ्यांचं ही प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान आज मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्प्रेस या गाड्या रद्द झाल्यात.
खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांना आवश्यक सुविधाही दिल्या असून, पूरस्थिती नियंत्रणात आहे. सध्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे,
खडकवासला धरणातून विसर्ग कमी
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.
एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून पोहोचवण्यात आलेलं नाही.तसेच वापरण्यासाठी पाणी नाही. या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत..