एक्स्प्लोर

Pubs Bar Restaurant New Rules : पब आणि बारसाठी नवी नियमावली, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Pubs Bar Restaurant New Rules : पब आणि बारसाठी नवी नियमावली, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

पुणे : पुणे 'हिट अॅण्ड रन' प्रकरणानंतर (Pune Porsche Car Accident) पब आणि  बारसंदर्भाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बार आणि पबमुळे रात्रीचा धिंगणा होतो आणि त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघातदेखील झाले आहेत. पब आणि बार नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पुण्यातील प्रकार रोखण्यासाठी महत्व पूर्ण निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. या पबवर कोणती कारवाई केली जाणार आणि नियम काय असतील यासंदर्भात माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 

कोणती कारवाई, काय असतील नियम?

१) परवाना कक्षा मध्ये 21/25 वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार

२) हॉटेल च्या ओपन टेरेसवर ( rooftop) मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार.

३) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार

४) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना

४) महिला वेटरेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना. 

५) विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे. 

६) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड (Ban Party) परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-1 ट्रेड मधुन Cash andh Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.

७) या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या शिवाय स्थानिक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने परिसरातील पब आणि रेस्टोरंटमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची संरचना उत्पादन शुल्क विभागाकडून उभी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल अत्याधुनिक तंत्रज्ञान व CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टोरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget