Dr. Anand Nadkarni | मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींच्या 'करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस' पुस्तकाचं प्रकाशन
कोरोनामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण घरात बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाले आहेत. यापैकी काही परिणाम हे दीर्घकाळ परिणाम करणारे आहेत. अशा काळात त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी असं पुस्तक येणं आवश्यक होतं असं प्रतिपादन एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी केलं.
एबीपी माझाच्या स्टुडियोत डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. एखाद्या वृत्तवाहिनीच्या स्टुडियोत एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजीव खांडेकर यांनी यापुढे असे प्रकाशन समारंभ अन्य वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या कार्यालयात होतील अशी आशाही यावेळी व्यक्त केली.























