Pravin Darekar : Mohit Kambhoj यांच्या मेहुण्यावरील आरोप अद्याप सिद्ध नाही : प्रवीण दरेकर
Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे. क्रुझवरील पार्टीतून या लोकांना अटक करण्यात आलं होतं. एनसीबी कार्यालयात देखील या तिघांना आणण्यात आलं होतं. मग त्यांना सोडण्याचे आदेश कुणी दिले. आमची मागणी आहे की, NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खुलासा करावा करावा. क्रुझवरील छापेमारीचं हे प्रकरण प्लॅन करुन केलेलं असून बोगस आहे, असा आरोपही त्यांनी केला.























