Prataprao Chikhlikar : अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात -प्रतापराव चिखलीकर
Prataprao Chikhlikar : अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात -प्रतापराव चिखलीकर आगामी काळात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय, चिखलीकर यांच्या या दाव्याने नांदेडच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्यात पक्षाच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपमध्ये अनेक जण येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. याचाच धागा पकडून एबीपी माझाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विचारणा केली असता त्यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असे स्पष्ट सांगितलं.























