Praniti Shinde: नाना...मानलं तुम्हाला! नानांच्या मदतीमुळे वाचला चिमुकलीचा जीव ABP Majha
सोलापूर दौऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मनाचा मोठेपणा पाहायला मिळाला. नाना पटोले यांनी चिमुकलीला उपचारासाठी मुंबईत जाण्यासाठी स्वतःचं हेलिकॉप्टर दिलं. उंजल तुकाराम दासी या ५ वर्षीय मुलीला हृदयविकाराचे उपचार मुंबईत करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत तातडीने पोहोचणं गरजेचं होतं. या संदर्भात उंजलच्या कुटुंबीयांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधला. ही बाब प्रणिती यांनी पटोले यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर पटोले यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर दासी कुटुंबाला मुंबईला जाण्यासाठी दिलं आणि स्वतः रेल्वेनं मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. पटोले यांच्या या कृतीचं कौतुक होतंय.























