Prakash Solanke : Dhananjay Munde चांगले वक्ते पण मी अजित पवारांची सभा मागितली
नगरपरिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना मानसन्मान आणि काम करण्याची संधी मिळावी यासाठी ही निवडणूक आहे.
बीडमध्ये भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख आहे. युती झाली असती तर नाराजी झाली असती म्हणून बहुतांश ठिकाणी दोघेजण वेगवेगळे लढत आहेत.
आत्ता जरी युती झालेली नसली तरी निवडणुकीनंतर एकत्र येऊनच महायुती कारभार करेल असा माझा विश्वास आहे.
माजलगाव मतदार संघातल्या दोन नगरपरिषदा आमच्या ताब्यात येतील असा आमचा विश्वास आहे
परळी नगरपरिषदेत बहिण भावाच एकत्र येणं हे स्वाभाविक आहे. यामध्ये फार काही राजकीय पाहण्याचं कारण नाही.
धनंजय मुंडे चांगले वक्ते आणि प्रभावी नेते आहेत त्यांना संधी मिळाली त्यांचा सहकारी म्हणून आनंद आहे.मी माजलगाव आणि धारूर साठी अजित पवार यांची सभा मागितली आहे. पालकमंत्री म्हणून आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत
माजलगाव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी प्रबळ दावेदार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या


















