Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीकविमा काढण्यासाठी आज शेवटचा दिवस
पीकविमा काढण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदाही प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली. पण, हा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह नसल्याचं दिसून येतंय. कालपर्यंत राज्यातील एकूण क्षेत्राच्या तुलनेत फक्त जेमतेम 20 टक्के पीकविमा काढण्यात आला. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उर्वरित 80 टक्के पिकांचं उद्दिष्ट गाठण्याचं मोठं आव्हान शासकीय यंत्रणेसमोर आहे. गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या तिघांचं मिळून कोटीत प्रीमियम घेतलं पण नुकसान भरपाई मात्र लाखांमध्ये दिली. त्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमधील पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे काही भागात शेतकऱ्यांना इच्छा असूनही पीकविमा काढता आलेला नाही. त्यामुळे पीकविमा काढण्याची मुदत वाढवण्याची मागणी शेतकतऱ्यांकडून होतेय. त्यामुळे बळीराजानं पीकविम्याकडे पाठ का फिरवली, असा प्रश्न विचारला जातोय.