Pradeep Kurulkar : Whatsapp Chat मध्ये राफेलपासून क्षेपणास्त्रांपर्यंत चर्चा, कुरुलकरचे कारनामे
Pradeep Kurulkar : Whatsapp Chat मध्ये राफेलपासून क्षेपणास्त्रांपर्यंत चर्चा, कुरुलकरचे कारनामे
डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी गुप्त संरक्षण योजनांखेरीज हिंदुस्थानी क्षेपणास्त्र यंत्रणेचीही माहिती पाकिस्तानी हेरांना पुरवल्याचा आरोप एटीएसने त्यांच्या आरोपपत्रात केलाय. याचेच आता व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. तसंच कुरुलकर यांनी राफेल विमानांपासून क्षेपणस्त्रांवरही चर्चा केल्याची माहिती एटीएसच्या हाती लागलीये. आरोपपत्रानुसार, कुरुलकर आणि जारा दासगुप्ता नावाची महिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. डॉ. कुरुलकर यानं ब्रह्मोस मिसाइल, अग्नी-६ मिसाइल, आकाश मिसाइल, अस्त्र क्षेपणास्त्र, ड्रोन प्रोजेक्ट, रुस्तम प्रोजेक्ट, यूसीएव्ही, डीआरडीओ ड्यूटी चार्ट, मिसाइल लाँचर, राफेल आदींबाबत झाराला सविस्तर माहिती दिली आहे. एटीएसने हे सर्व चॅट्स डॉ. कुरुलकर याच्याविरोधात विशेष न्यायालयात दाखल १८३७ पानांच्या दोषारोप पत्रासोबत जोडले आहे.