एक्स्प्लोर
Maharashtra Rains: भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर, ४३ हजार शेतकऱ्यांचे १८ हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त!
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ४७४ गावांमधील सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून १८ हजार हेक्टरवरील भातपीक (Paddy Crop) आणि भाजीपाला पूर्णपणे नष्ट झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक नजर अंदाज अहवालानुसार, 'जिल्ह्यातील चारशे चौऱ्याहत्तर गावांतील सुमारे त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय'. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका साकोली (Sakoli) तालुक्याला बसला असून येथील पंचवीस हजार सातशे तीस शेतकऱ्यांच्या नऊ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीनंतर, भंडारा जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल.
महाराष्ट्र
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : 100 माणसे मरु पण एकही झाड तोडू देणार नाही,सयाजी शिंदे आक्रमक
Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























