Pooja Khedkar on Washim Police | वाशिम पोलिसांनी कसलीही चौकशी केली नाही, पूजा खेडकरांची प्रतिक्रिया
Pooja Khedkar on Washim Police | वाशिम पोलिसांनी कसलीही चौकशी केली नाही, पूजा खेडकरांची प्रतिक्रिया
हे देखील वाचा
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पुणे : पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी आय ए एस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची (Non Creamy Layer Certificate) अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्र सरकारला त्याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत. त्यासाठी आयकर विभागाकडून खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची माहिती आणि त्यांच्या आई - वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागविण्यात आलीय. त्याचबरोबर स्वतः पूजा खेडकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागविण्यात आलीय. अहमदनगर चे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही माहिती जमा करायला सुरुवात केलीय.
वादग्रस्त पूजा खेडकरांच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सगळी माहिती दिली जाणे अपेक्षीत आहे. त्याच संदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी चौकशी करत आहेत. पूजा खेडकरांचे आई वडील जरी एकमेकांपासून विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आले असले तरी दोघांचे उत्पन्न हे तपासले जात आहे. त्याचबरोबर पूजा खेडकरांच्या नावावर देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्या मालमत्तेपासून त्यांना उत्पन्न देखील मिळते. हे सर्व तपशील पूजा खेडकरांनी आयकर विभागाकडे दाखल केलेल्या आयटीआरमधून समोर आले आहेत. ही सर्व माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकऱ्यांकडून गोळा केली जात आहे.