Pooja Khedkar News : पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा फोन बंद; आरोपांवर पूजा खेडकर काय म्हणाल्या?
Pooja Khedkar News : पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा फोन बंद; आरोपांवर पूजा खेडकर काय म्हणाल्या?
Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकरांच्या मागे पंकजा मुंडेंचा हात? मनोरमा खेडकर यांची मुंडेंच्या ट्रस्टला 12 लाखांची देणगी
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा सुरु असताना खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडेंसोबत (Pankaja Munde) असलेले संबंध समोर आलेत. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलंय. 3 ऑक्टोबर 2023 रोजी एका चेकच्या माध्यमातून ही देणगी देण्यात आली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला दीड किलोचा चांदीचा मुकुटदेखील अर्पण केला होता. त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षांपासून भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.
स्वतः दिलीप खेडकर हे भाजपशी संबंधित राहिले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून तिकीट न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन लोकसभेची निवडणूक लढवली होती.
पूजा खेडकरांना बनावट सर्टिफिकेट कुणी दिली?
आपल्या चमकोगिरीने अडचणीत आलेल्या आणि नंतर एकाहून एक कारनामे बाहेर पडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यामागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे असा प्रश्न विचारला जात आहे. पूजा खेडकरांनी बनावट अंपंगत्वाचा दाखला तसेच खोटी माहिती देऊन ओबीसी क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं आहे. यापैकी कोणत्याही प्रवर्गात त्या बसत नसताना त्यांना ही खोटी सर्टिफिकेट कुणी दिली असा प्रश्न विचारला जात आहे.