एक्स्प्लोर

Pooja Khedkar Case : कारवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजा खेडकरांच्या आईकडून दमदाटी

Pooja Khedkar Case : कारवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजा खेडकरांच्या आईकडून दमदाटी   प्रशिक्षणार्थ कार्यकाळ सुरू असताना चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांच्या (Pooja Khedkar) आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना ही दमदाटी करण्यात आली. सगळ्यांनाच आतमध्ये टाकेन असं बोलत पूजा खेडकरांच्या आईने पोलिसांना दमदाटी केली, तसेच  पोलिसांना गेटबाहेरच उभं केल्याचं दिसून आलं. तसेच बंगल्याला आतमधून कुलूप लावण्यात आलं आहे.   ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली. त्यांनी गेटला आतमधून कुलूप लावलं. तसेच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना गेटबाहेरच उभं केलं.   खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला ट्रेनी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकरांनी ती गोष्ट केली. तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावल्याची घटना घडली. अधिकारात नसताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून एक गाडी आणि शिपायी तसेच कार्यालयाची मागणी केली.   खोट्या अपंग कागदपत्रांच्या आधारे कलेक्टर ट्रेनी आयएएस असताना अवाजवी मागण्या करून वरिष्ठांना दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकर यांचं पितळ आता उघड पडलं आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अंपग दाखल्याच्या आधारे आयएएस पद मिळवल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकरांनी ट्रेनी कार्यकाळात जे वर्तन केलं त्याबाबतचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. त्याचसोबत मसुरी येथील प्रशिक्षण संस्थेने पूजा खेडकरांच्या वर्तनासंबंधी अहवाल महाराष्ट्र शासनाकडून मागवला आहे.   पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल करा डॉ. पूजा खेडकर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फायदा कसा घेतला? त्यातील असणाऱ्या अटी आणि नियमायांचे पालन झाले नाही का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. प्रोबेशनरी पदावर असताना त्यांना होम टाऊन कसे मिळाले? पोलिसांनी त्यांच्या गाडीवर कारवाई केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?
Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget