PM Narendra Modi Washim : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पोहरादेवी देवस्थानच्या दौऱ्यावर
PM Narendra Modi Washim : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पोहरादेवी देवस्थानच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याच्या निमित्ताने येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे शहरात दाखल होणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाकडून जय्यत तयारीही केली जात आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याच्या निमित्ताने येत्या शनिवारी, ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे शहरात दाखल होणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाकडून जय्यत तयारीही केली जात आहे. या कार्यक्रमाला ४० हजार नागरिकांची उपस्थिती राहणार असून, तब्बल १२०० वाहनांचे पार्किंग, हेलिपॅड व सभास्थळाच्या आढाव्यासाठी प्रशासनाच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी ठाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सभास्थळाची सोमवारी पाहणी केली. त्यामुळे या दौऱ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान' कार्यक्रमला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीसाठी सोमवारी ठाणे महापालिका मुख्यालय येथे बैठक झाली. तब्बल ४० हजार नागरिकांची या कार्यक्रमाला गर्दी होण्याची शक्यता असून, ठाणे तसेच आसपासच्या परिसरातूनही सुमारे १२०० गाड्यांची ये-जा घोडबंदर परिसरात या सोहळ्याच्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे या भागात रस्ते वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे.