Zero Hour : PM Narendra Modi ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीत, काँग्रेसची टीका, कारण काय?
Zero Hour : PM Narendra Modi ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीत, काँग्रेसची टीका
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला...आणि आता लक्ष ४ जूनच्या निकालाकडे लागलंय. मोदी सत्तेची हॅटट्रिक करणार का, याबाबतसुद्धा उत्सुकता आहे...असं असताना मोदी मात्र ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला गेलेत...शेवटच्या टप्प्यातलं मतदान आणि ध्यानधारणा हे मोदींचं नेमकं समीकरण काय आहे, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
२०६ सभा आणि रोड शो...८० मुलाखती...आणि आता कन्याकुमारीत ध्यानधारणा. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या...आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट पोहोचले कन्याकुमारीला. कन्याकुमारीत दाखल होताच मोदींनी भगवती देवी अम्मन मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. विवेकानंद शिलावर मोदी एक तारखेपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत.
विवेकानंद रॉक मेमोरियल हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक हे स्मारक वावथुराईच्या मुख्य भूमीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या दोन खडकांपैकी एका खडकावर उभे आहे. विशेष म्हणजे देशभरातल्या प्रवासानंतर स्वामी विवेकानंदांनी याच ठिकाणी तीन दिवस ध्यानधारणा केली होती.
970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या सन्मानार्थ बांधलं गेलं होतं. मोदींच्या आयुष्यावरही स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव दिसून येतो.