एक्स्प्लोर
Satara Doctor case : वर्दीला कलंक, फलटणमध्ये रक्षकच बनला भक्षक
फलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने (Doctor Suicide) महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badne) आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. मृत डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 'पोलिस उपनिरीक्षक बदनेने चार वेळा बलात्कार केला'. या नोटमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. PSI बदनेला निलंबित करण्यात आले असून, दुसऱ्या आरोपीला अटक करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. पीडित डॉक्टरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Postmortem Report) बदलण्यासाठी राजकीय आणि पोलीस यंत्रणेकडून दबाव टाकला जात होता, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. साताऱ्याचे एसपी तुषार दोषी (SP Tushar Doshi) यांनी या प्रकरणात कोणताही दबाव न घेता कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
शेत-शिवार
Advertisement
Advertisement

















